आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे. कोल्हेंच्या या भूमिकेला कडाडून विरोध होताना दिसत आहे. अशातच आता तीन तरूणांनी अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण, असं या तीन तरूणांचं नाव आहे.
हे ही वाचा : कोणत्या निकषावर मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत? चंद्रकांत पाटलांचा सवाल
अमोल कोल्हे यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कोल्हे यांच्या नारायणगाव येथील अमोल कोल्हे यांचे निवासस्थानाबाहेर बसून महात्मा गांधी की जय अशा घोषणा देऊ, असं तरूणांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजारी कोल्हे यांना स्वास्थ्य सुधारण्यासाठी गुलाबाची फुलं देणार असल्याचंही या तीन तरुणांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना आमने-सामने; भाजप नगरसेवकांनी केलं दालनाबाहेरच 6 तास आंदोलन
अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता