Home महाराष्ट्र मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना आमने-सामने; भाजप नगरसेवकांनी केलं दालनाबाहेरच 6 तास आंदोलन

मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना आमने-सामने; भाजप नगरसेवकांनी केलं दालनाबाहेरच 6 तास आंदोलन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना पुन्हा आमने सामने आले आहेत. महापालिकेत भाजप नगरसेवक पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शुक्रवारी स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांना बोलू न दिल्यानं भाजप सदस्यांनी दालनाबाहेरच आंदोलन सुरु केलं. त्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सहा महत्वाच्या चौकाच्या लॅन्डस्केपिंगच्या प्रस्तावावरुन या वादाला तोंड फुटलं. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चर्चा करु न देता प्रस्ताव मान्य केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केलं.

हे ही वाचा : अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

महापालिकेतील वातावरण चिघळू नये यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मध्यस्ती करत भाजप नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष आम्हाला बोलूच देत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आंदोलनावर ठाम राहिले.

दरम्यान, भाजप सदस्यांचं हे आंदोलन 6 तासांपेक्षा अधिक काळ सुरु होतं. दुपारी सुरु झालेलं हे आंदोलन रात्री साडे नऊ पर्यंत सुरु होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले?; नथुराम गोडसे भूमिकेवरुन कोल्हेंवर टीका करणाऱ्या नेत्यांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत

Why I Killed Gandhi : नथुराम गोडसे भूमिकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..“अफझल खानाचीही…”