आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्या एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. अशातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 शी बोलत होते.
एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे ही वाचा : गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा
दरम्यान, अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटंल आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”