खेळ तर आत्ता सुरू झालाय उद्धव ठाकरेजी…; तुरूंगातून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

0
165

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी एका आठवड्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर न्यूज रुममध्ये दाखल होऊन अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही. तसेच खेळ तर आता सुरु झाला आहे., असं म्हणत अर्णब गोस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच रिपब्लिक चॅनेलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामी यांनी उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय., असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त”

“ज्यांनी मराठी बाईचं कुंकू पुसलं, किरीट सोमय्या त्यांना वाचवायला बघत आहेत”

सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here