आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात भूमी वर्ल्ड हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा खाजगी औद्योगिक प्रकल्प मागील 14 वर्षांपासून कार्यान्वित आहे. आता भूमी वर्ल्डच्या दुसर्या टप्प्यातील कामास जानेवारी 2022 पासून सुरुवात होत आहे.या टप्प्यात 50 एक्कर वर उद्योग धंद्यांना वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांनी युक्त गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बिघडत चाललेली अर्थव्यवस्था, उद्योगधंदे आणि औद्योगिक क्षेत्राला आलेली संथगती लघु व मध्यम उद्योजक अडचणीत आले होते. यातच
करोनाच्या पहिल्या लाटेत सर्व प्रकल्प उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे आर्थिक चक्र पूर्ण ठप्प झाले. या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत भुमि उद्योगाचे प्रमुख प्रकाश पटेल यांनी भिवंडीतील स्थानिक प्रशासन आणि लघु मध्यम उद्योजकांची मोट बांधत भुमि उद्योगनगरीत अनेक यशस्वी प्रयोग करत आहेत.
प्रकल्पाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी सन 2008 सालापासून भिवंडी तालुक्यातील पिंपळास व पिंपळनेर गावांतील गावकऱ्यांना व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी “भूमी वर्ल्ड” या नावाखाली एका औद्योगिक संस्था उभारण्याचे ठरवले. त्यासाठी तेथील मिळकती विकत घेऊन त्यावर असा मोठा प्रकल्प उभा केला.
हे ही वाचा : “शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल”; भाजप नेत्याचा इशारा
सद्य परिस्थितीत भूमि वर्ल्ड या प्रकल्पात 1600 पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या औद्योगिक संस्था कार्यरत आहेत. यात देश- विदेशातील नामांकित कंपन्यांचे उद्योग प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पात 3000 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. तसेच या औद्योगिक संस्थामध्ये 42000 पेक्षा जास्त कुशल–अकुशल कारागीर काम करत आहेत. तसेच गरिब पुरुष आणि महिला यांस रोजगार उपलब्ध होत आहे.
एप्रिल 2020 मध्येच भूमीमध्ये करोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री बनवण्यास सुरुवात केली.
त्यामध्ये सर्जिकल मास्क, कापडाचे मास्क,सॅनिटायझर,ऑक्सीजन प्लांट आणि रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. आता भुमी वर्ल्ड मधून बऱ्याच गोष्टी विदेशात निर्यातही होत आहेत.
पहिल्या लोक डाऊन मध्ये मुंबई व ठाणे या परिसरात राहणाऱ्या उत्तर भारतीय लोकांना कुठलेच काम नव्हते. त्यामुळे ते आपल्या घराकडे पायी निघाले होते अशा वेळी भूमी वर्ल्डने या लोकांना कामाची आवश्यकता आहे. त्यांना आपल्या प्रकल्पात काम उपलब्ध करून दिले ज्यांना अन्न,वस्त्र व निवाऱ्याची सुविधा तब्बल तीन महिने पुरवली. या कामाची दखल दुबईतील एका नामांकित संस्थेने घेतली. भुमी वर्ल्ड चे संचालक प्रकाश पटेल आणि संदीप पटेल यांना पुरस्कारही दिला.
भूमि वर्ल्ड या प्रकल्पात खालील क्षेत्रातील औद्योगिक संस्था कार्यरत आहेत:
• अन्न प्रक्रिया (Food Processing)
• कपडे (Textile & apparels)
• अभियांत्रिकी (Engineering)
• पॅकेजिंग (Packaging)
• छपाई (Printing)
• रत्ने आणि दागदागिने (Gems & Jewellery)
• ऑटोमोबाइल (Automobile)
• प्लास्टिक वस्तू (Plastic Components)
• मशीन टूल्स (Machine Tools)
• रबर वस्तू (Rubber Components)
• ऑटो वस्तू (Auto components)
• औषधे आणि पूरक वस्तू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली बहुचर्चित “मेक इन इंडिया” आणि 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेली “मॅग्नेटिक महाराष्ट्र” अशा विविध शासकीय योजना अंतर्गत अशा औद्योगिक संस्थांनी प्रकाश पटेल यांच्यासोबत करार केले आहेत. यात अनेक बहुराष्ट्रीय आणि विदेशी कंपन्यांनी या प्रकल्पात स्थापना करून त्यांनी त्यांची उत्पादननिर्मिती कार्य भूमी वर्ल्ड प्रकल्पात सुरू केली आहेत.
“मेक इन इंडिया” या योजनेच्या पुढाकाराचा एक भाग म्हणूनच, जपान, जर्मनी, स्वीडन, युके, दुबई सारख्या देशांमधून २० पेक्षा जास्त परदेशी कंपनी “भूमी वर्ल्ड” या प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. त्यांची जवळपास रुपये ५०० कोटींच्यावर गुंतवणूक केली आहे. याचा रोजगार व महसूल निर्मितीसाठी मोठा हातभार लागत आहे. भिवंडी परिसराचा सर्वांगीण विकास होत आहे.
“भूमी वर्ल्ड” या प्रकल्पामध्ये तांत्रिक कौशल्य विकास केंद्र कार्यरत आहे, जिथे भिवंडी व आसपासच्या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय महिला आणि दारिद्र्यरेषेखालील महिला यांना “पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमा” अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते.नंतर प्रकल्पामधील औद्योगिक संस्थांमध्ये विविध उत्पादन क्षेत्रात रोजगार प्रदान केले जातो. त्यामुळे महिला सशक्तीकरणासह सामाजिक व आर्थिक सबळीकरणास हातभार लागत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले; अमृता फडणवीसांचा टोला
“नाना पटोलेंचं वक्तव्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, पोलिसांनी त्यांना अटक करावी”
मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा