Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.  यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थनं दिलं आहे.

करोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. राज्य सरकारला खर्च करावा लागतं आहे. उलट तो वाढला आहे. तर उत्पन्नाचे रस्ते मात्र बंद झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडं जाऊन केलेली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

मद्य विक्री म्हणून नाही, तर सगळेच पर्याय बंद आहे, पेट्रोल डिझेल, स्टॅम्प ड्यूटी बंद, केंद्राकडून जीएसटीचा परतावा आलेला नाही. त्यामुळे उत्पन्नाचे रस्ते हळूहळू खुले होणं आवश्यक आहे. ते कोणत्याही माध्यमातून खुले करावेच लागतील. महाराष्ट्रालाच नव्हे तर सगळ्याच राज्यांना हा निर्णय घ्यावा लागेल, असंही छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी-

‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

राज ठाकरेंच्या मागणी मागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना?; अग्रलेखातून सवाल

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…