Home महाराष्ट्र ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला...

‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

पुणे : देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा मांडला. जिल्ह्यातील इतर आमदार, खासदारही यावेळी उपस्थित होते.

ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरियासारख्या आजारांसह दैनंदिन आयुष्य जगत आहोत त्याचप्रमाणे ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ अशी योजना केंद्र सरकारने आखली पाहिजे”. “लॉकडाउन दीर्घकाळ सुरु ठेवणं आपल्या उद्योग, कामगार आणि नोकरदार वर्गाला परवडणारं नाही. सोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे, असं अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंच्या मागणी मागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना?; अग्रलेखातून सवाल

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…

महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र