Home महाराष्ट्र शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा श्वास, महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांनी…; शिवसेनेचा...

शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा श्वास, महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांनी…; शिवसेनेचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात, असा निर्णय राज्य सरकारनं पार पडलेल्या बैठकीत घेतला. या निर्णयावरून राज्यातील विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा श्वास आहे. तसेच मराठी भाषेचा मानसन्मान राहावा हे ठाकरे सरकारचे धोरणच आहे. जेंव्हा मराठीच्या बाबतीत ‘मराठी शाळां’चा विषय चर्चेला येतो तेव्हा वेदना होतेच. मात्र मराठी शाळा बंद पडत आहेत त्यास जबाबदार कोण? आपलेच लोक मराठी शाळांकडे, मराठी माध्यमांकडे पाठ फिरवीत आहेत. हे पाहता प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे व प्रत्येक स्तरावर मराठी भाषा सक्तीची व्हावी हाच त्यावरचा एक उपाय आहे,  असं राऊत म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट भाषा करणाऱ्या महाभागांनी चेन्नई, बंगळुरू, हैदराबादेत अशी भाषा करण्याचे धारिष्टय़ दाखवून पाहावे, असा घणाघात संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला

‘…तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही’; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

…तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य