Home महाराष्ट्र …तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

…तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड वित्त माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपाने नाराजी जाहीर केली आहे.

निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयावरुन वाद निर्माण झाला असताना प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद  घेत आपली बाजू मांडली.

हे ही वाचा : “देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत, त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही”

“प्रताप सरनाईक मराठी आहे. माझी विहान कंस्ट्रक्शन कंपनी 1989 सालची आहे. 97 मध्ये नगरसेवक आणि 2009 मध्ये आमदार झालो. आधी एक व्यावसायिक म्हणून उदयास आलो आणि नंतर राजकारणात आलो. फक्त मराठी प्रताप सरनाईक दिसतो, पण हिरानंदानी, लोढा यांचं नाव का घेतलं नाही? त्यांना का दंड आकारला नाही? महापालिकेला मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर विकासक म्हणून मला इतकं नुकसान होत असेल तर भविष्यात कोणीही विकास करण्यासाठी पुढे सरसावणार नाही,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विहंग गार्डन इमारतीत एक इंच जरी अनधिकृत बांधकाम असेल तर प्रताप सरनाईक दुसऱ्या दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल, असंही यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे, त्यांनी माझी काही काळजी करू नये; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

“शिवसेना नेते गुलाबराव पाटील कोरोना पाॅझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती”

प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला