आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : राष्ट्रवादी नेते एकानाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. अशातच एकनाथ खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी निशाणा साधला होता. त्याला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : ‘या’ सरकारमध्ये आम्हाला कुणी विचारत नाही, मी भाजपाच्या पाठिंब्याने आमदार झालो; शिवसेना आमदारांचं मोठं वक्तव्य
कोथरूडमधील एका गुन्ह्याप्रकरणी आज पुणे पोलिसांकडून जळगाव शहरात छापे मारी केली जात आहे. मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी हे छापे घातले गेले असू शकतील असा अंदाज बांधला जातोय. याच पार्श्वभूमीवर काल मोक्काच्या भीतीने गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवं, असं गिरीश महाजन म्हणाले होते. त्याला खडसेंनी पुन्हा उत्तर दिलं आहे.
मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, असा टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एका एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ठाण्यात अविनाश जाधव यांच्या हस्ते अनेक महिला आणि युवकांचा मनसेत प्रवेश
मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी
आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन