Home महाराष्ट्र किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावरून आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी, राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय सुरू, काय बंद”

सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान,  काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढविण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत,’ असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजपच्या ‘या’ आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी पुणेकरांने बनवलं अजब यंत्र

खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते, पण…; शिवसेनेचा किरीट सोमय्यांवर निशाणा