मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली, या पार्श्वभूमीवर राज्य कोरोनाशी लढतंय अन् भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्य कोरोनाशी लढतंय अन् भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा, असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, आज एकिकडं भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
राज्य कोरोनाशी लढतंय अन भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!
आज एकिकडं भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करा- शरद पवार
सांगलीकरांनी पुन्हा करुन दाखवलं, सांगली जिल्हा करोनामुक्त
…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र
सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील