आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा अखेर आज निकाल लागला असून भाजपाच्या सिद्धिविनायक पॅलनं मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात तर चक्क कोकणी भाषेत कलगीतुरा रंगू लागला आहे.
“देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…” असं आशिष शेलार म्हणाले होते. त्याला काँग्रसे नेत सचिन सावंत यांनी कोकणी भाषेतच प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : “महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण”
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची 25 वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो”, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो. https://t.co/wuTY7gSxJQ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 31, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”
काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर
राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका