Home महाराष्ट्र सिंधदुर्गातील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सिंधदुर्गातील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळवता आला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

भाजपची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला, असं नारायण राणे म्हणाले.

विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे, असंही राणेंनी यावेळी म्हटलं. तसेच आता पुढील लक्ष्य राज्यातील सत्ता असल्याचंही राणेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर

राज्यातील विरोधी पक्ष भरकटलेला आहे, त्यामुळे…; संजय राऊतांची टीका

“मोठी बातमी! काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”