आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला.
राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र फडणवीस आणि अजित पवारांना यांची खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही. त्यामुळे विरोधकांना सत्तेतून हटवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही खेळी खेळली असल्याचं म्हणतात. यावरून आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “कन्येच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण”
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असं म्हणतात हे खरं आहे. पण मी पाठवलं असतं, तर तिथे राज्यच बनवलं असतं. असं अर्धवट काही काम केलं नसतं. याच्यात काहीही अर्थ नाही. त्यात दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असं पवारांनी यावेळी म्हटलं. ते लोकसत्ताशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
मी केंद्रीय मंत्री आहे, मला अशी नोटीस पाठिवता येत नाही- नारायण राणे
“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”
जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी