Home महाराष्ट्र नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा

नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदूर्ग :  सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणाच मुख्य सूत्रधार भाजप आमदार नीतेश राणे असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

सचिन सातपुते हे नितेश राणे यांच्या जवळचे मानले जातात. सातपुते याच्या अटकेनंतर नितेश राणेलाही अटक करण्यात यावी, अन्यथा शिवसेना कणकवलीत आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

हे ही वाचा : आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला?; भाजपचा आरोप

नितेश राणे हे भाजपचे नेते आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावात न येता त्यांच्यावर कारवाई करावी, असं शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी नितेश राणे यांना रविवारी तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली बोलावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजार राहिले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप कार्यकर्त्यांवरील अटकसत्र थांबवा, अन्यथा…; नारायण राणेंचा इशारा

भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका

“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”