आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये विटंबना करण्यात आली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणावरून आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारवर जहरी टीका केली आहे.
बंगळुरू मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाइफेक करून विटंबना केली. हे चुकीचं असून त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी माणसांचेच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानातील शिवभक्तांचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कदापी खपवून घेणार नाही, अशी टीका शिंदे यांनी राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात केली आहे.
हे ही वाचा : “तेंव्हा बघ्यांची भूमिका घेणारे फडणवीस सभागृहात मोदींची नक्कल होताच तडफनीस झाले”
कर्नाटक सरकारकडून सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बांधवावर सातत्याने होत असलेला अन्याय, अत्याचार व दादागिरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. जसे मराठी भाषिक तिथे कर्नाटकात राहतात तसेच अनेक कन्नड भाषिक लोक सुद्धा इथे महाराष्ट्रात राहतात. त्यांच्याशी आम्ही तसंच वागावे का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, याबाबत आता निर्वाणीचा निर्णय घ्यायची वेळ आली असून कठोर निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला
मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा