Home महाराष्ट्र अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला दिला होता. यावरून शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का, असा सवाल करत पेडणेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आपला संताप व्यक्त केला. तसेच चंद्रकांत दादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, असा पलटवार पेडणेकरांनी यावेळी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकता, असं पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा

“हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”

…याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका