आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता त्यानंतर मनसेच्या आणखी एका मोठ्या नेत्यानं शिवसेना नेत्याची भेट घेतली असल्याची बातमी समोर आली होती.
हे ही वाचा : इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका; पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
मनसे नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली. यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली.
पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं), असा पलटवार अमेक खोपकर यांनी केला.
पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं)
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा
“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”