आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 5 जुलै 2021ला भाजपाच्या 12 आमदारांनी केलेला हा गदारोळ. या नंतर भाजपच्या या 12 आमदारांना निलंबन करण्यात आलं होतं, आता 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसलाय.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून छगन भुजबळां नी विधानसभेत ठराव मांडला. त्याचवेळी विधानसभेत भाजपाच्या आमदारांनी जोरदार हंगामा केला होता. अध्यक्षस्थानी, तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार cहोते. गदारोळ सुरू असतानाच भाजपाचे आमदार संजय कुटेंनी अध्यक्षांचा माइक ओढला.
हे ही वाचा : हिंमत असेल तर…; विधानपरिषद निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला ओपन चॅलेंज
भाजपाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केला होता. यांनतर भाजपच्या या 12 आमदारांना निलंबन करण्यात आलं होतं.
संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीयांचा समावेश आहे.
दरम्यान, विधीमंडळाकडे निलंबनाच्या निर्णयाचा, फेरविचार करण्याची मुभा दिल्याचं भाजप आमदार आशिष शेलारांनी सांगितलंय.
महत्वाच्या घडामोडी –
औरंगाबादेत राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय; जिल्हाध्यक्षांना पदावरुन काढलं!
“आजचा पराभव हा तर नाना पटोलेंचा पराभव, त्यांच्या मोगलाईमुळंच काँग्रेसचा पराभव झाला”
महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान