आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपला देशाचे ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं. आम्हाला हे कळालं आहे की भाजप देशाला किती मागे नेतोय हे त्यांनी 1996 च्या आसपास सांगितलं होतं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. त्याला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.
हे ही वाचा : भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच- जितेंद्र आव्हाड
संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही. राष्ट्रवादीचे आहेत शरद पवार त्यांचे नेते आहेत की, शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत हेच कळत नाही. संजय राऊत दिल्लीमध्ये शरद पवारांच्याच कार्यालयामध्ये असतात. पक्षाशी प्रामाणिक नाहीत, निष्ठा नाही. ते फक्त आव आणायचे काम करतात. ते दाखवतात तसे नाहीत, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पवारांच्या मोजक्या भाषणांचा संग्रह असलेले पुस्तक ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी –
लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर अखेर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीसाठी सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले…
“पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”