Home महाराष्ट्र शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?- किरीट सोमय्या

मुंबई : आता ठाणे पोलिसांनी श्रीमती अनंत करमुसे यांना पोलिस स्टेशन येथे आरोपी म्हणून बोलावले आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोणतीही कारवाई नाही पण करमुसे कुटुंबीयांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव? आत्ता शरद पवार आणि  मुख्यमंत्री गप्प का?, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याने त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला होता. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याने केला होता.

दरम्यान, हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो. माझ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्या अनेकदा लक्षात आणून दिली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. खरं तर तो केव्हाच गजाआड जायला हवा होता. पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं, असंही आव्हाड यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान झालं आहे”

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

“सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचंय”

…तर तुमचा कणखरपणा दिसला असता; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा