मुंबई : वाधवान प्रकरणातील संबंधित अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांना ही परवानगी स्वत:च्या अधिकारात देणार नाहीत. कोणीतरी त्यामागे आहे.’ आता कोणीतरी म्हणजे कोण? नुसते शब्दांचे बुडबुडे का उडवता? असा सवाल सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान नक्कीच झाले आहे. पण शिजवलेले कारस्थान कच्चे राहिले असं यावेळी म्हटलं आहे. पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांना ‘वाधवान’ प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले. ते हिंदुस्थानी प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याने पुढची कारवाई केंद्र सरकारने करायला हवी, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान,केंद्र सरकार `वाधवान’प्रकरणी काय करते आणि पोलीस अधिकारी गुप्ता यांचा खरा सूत्रधार कोण हे मौलिक प्रश्न महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने केंद्र सरकारला विचारायला हवेत, असं अग्रलेखात सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारचा मोठा निर्णय; नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द
“सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचंय”
…तर तुमचा कणखरपणा दिसला असता; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
…तर सरकारला प्रश्न जरूर विचारणार; निलेश राणेंच मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र