आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा : पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची आहे, त्यामुळे…; अजित पवारांच मोठं वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्या मालकीच्या जगमित्र साखर कारखाना आहे. हा कारखाना ज्या जमिनीवर आहे ती जमीन मुंडे यांनी फसवणुकीनं बळकावल्याचा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, 1988 मध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्याचा अंगठा घेऊन मुंडे यांनी 2010 साली जमीन आपल्या नावावर केल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच फडणवीस सरकारच्या काळात जगमित्र कारखाना प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. पण धनंजय मुंडे यांनी आपल्याविरूद्धच्या गुन्ह्यामंध्ये सूरू असणारी चौकशी थांबवण्यात यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयानंच मुंडे यांच्याविरूद्धच्या गुन्ह्यांची चौकशी चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील
“शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली, हे तुम्ही बरं खपवून घेतलंत”