Home महाराष्ट्र इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील

इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील मागील पाच वर्षात नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेतून भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं.

हे ही वाचा : “शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली, हे तुम्ही बरं खपवून घेतलंत”

जनता सुज्ञ असून पाच वर्षात शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करणार्‍यांना आगामी निवडणुकीत निश्‍चितपणे जागा दाखवून देईल. काँग्रेस पक्षाने सातत्याने सामान्य माणूस आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. शहराचा सर्वांगिण विकास हवा असेल तर नगरपालिकेत सत्ता असणे आवश्यक आहे, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान,  सतेज पाटील हे शुक्रवारी विविध विकासकामांच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली. काँग्रेसभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

जनतेनंही ठरवलंय, 2024 मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार…

राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

मनसे म्हणजे गळकं घर, तर शिवसेना म्हणजे चिरेबंदी वाडा; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मनसेला टोला