आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानामुळं सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने शेतकरी आंदोलन आणि शीख समुदाय यांच्यावर खलिस्तान संदर्भात आक्षेपार्ह इंस्टाग्राम पोस्ट केली होती. यावरून मुंबई पोलिसांनी कंगणाविरोधात एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कंगणानं मुंबई उच्च न्यायायलयात धाव घेतली आहे.
हे ही वाचा : मी पंतप्रधानांसारखा नापास नाही, माझं मार्कशीट पाहू शकता; काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला
कंगना रणौतने 23 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलन, शीख समुदायावर खलिस्तान संदर्भातील वादग्रस्त पोस्ट इंस्टाग्रामवर केली होती. त्या पोस्टवरुन कंगना रणौतवर भारतीय दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, कंगनानं चुकीच्या पद्धतीन गुन्हा दाखल केल्याचा दावा करत अधिकारांचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करावं यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये ठिणगी; प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे शिवसेनेवर गंभीर आरोप
अबब! 20 वर्षांची तरुणी पडली 77वर्षीय आजोबांच्या प्रेमात; खोटं बोलून करणार होती लग्न, पण…
“….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”