Home महाराष्ट्र “सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त...

“सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचंय”

मुंबई : कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा राज्यांनी स्थापन केलेल्या मदत निधीला केली जाणारी मदत ही सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत गृहीत धरली जाणार नाहीय. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या एका माहिती पत्रकात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.

सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे, म्हणून असे आरोप केले जात आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवार हे अर्धसत्य सांगत आहे. जीएसटी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये 50-50 टक्केच वाटला जात आहे. मात्र, यावेळी जीएसटीच कमी जमा झाल्याने महाराष्ट्राकडे ही तूट निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारचं आभार मानले आहेत. मात्र काही मंत्री कोणत्याही गोष्टींचे राजकारण करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर तुमचा कणखरपणा दिसला असता; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

…तर सरकारला प्रश्न जरूर विचारणार; निलेश राणेंच मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र

“चंद्रकांतदादा, सगळा देश सध्या कोरोना विरोधात लढाई लढतोय… अन् तुम्हाला राजकारण सुचतंय”

“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”