आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार कंबर कसली आहे. अशातच पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा : ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे राज्य सरकारचंच काम, केंद्र सरकारचं नाही- प्रीतम मुंडे
साहेब, २००६ ला माझे वडील गेले आणि अवघ्या ५ महिन्यांनंतर मी नगरसेवक झालो, तेव्हापासून कोणीच मला विचारले नाही जे तुम्ही काल विचारले. “वसंत, मी गेल्या अनेक मीटिंग मध्ये पाहतोय तू बोलत नाहीस, तू काही तरी स्ट्रेस मध्ये आहेस., अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.
आणि मला तिकडेच वाटले की या माझ्या जीवनात अजूनही एक व्यक्ती आहे जी माझ्या चेहऱ्यावरील तणाव ओळखू शकते! मी त्यामुळे थोडा भावनिक झालो होतो, मला नेहमी वाटते की माझा पक्ष हा पुण्यात एक नंबरला असावा., असं वसंत मोरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
आणि मला तिकडेच वाटले की या माझ्या जीवनात अजूनही एक व्यक्ती आहे जी माझ्या चेहऱ्यावरील तणाव ओळखू शकते! मी त्यामुळे थोडा भावनिक झालो होतो, मला नेहमी वाटते की माझा पक्ष हा पुण्यात एक नंबरला असावा.
२/२
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) December 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“सिंधुदुर्गात भाजपचा शिवसेनेला दणका; राणे पती-पत्नीचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश”
प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; भाजप-मनसे एकत्र येणार?; प्रसाद लाड म्हणाले…
…म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी