मुंबई : सत्ताधारी आणि विरोधीपक्षात मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यांत चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे.
जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना त्याची गरज सगळ्यात जास्त असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. याला आता जयंत पाटलांनी सडेतोड दिलं आहे.
चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटतं, असं जयंत पाटील म्हणाले.
चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन
“संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो”
पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड