आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानेही ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना
आयोगाच्या या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या 27 टक्के जागा वगळून ऊर्वरित 73 टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –A
भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; गोव्यातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?
ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा
महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल