Home महाराष्ट्र अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना

अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

परभणी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचं होत असलेलं मोठं नुकसान टाळलं आहे. अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत राष्ट्रवादीशी नाराज असलेल्या आमदारांची भेट घेत नाराजी दूर केली.

हे ही वाचा : भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; गोव्यातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार व परभणीचे जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी यांची नाराजी दूर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीसाठी काल बाबाजाणी दुर्राणी यांना निरोप पाठवला व ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला होता. पक्ष आपल्या राजीनाम्याची दखल घेईल, आपली समजूत काढेल असा दुर्राणी यांचा समज होता. परंतु जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली असली तरी तीन दिवस मुंबईत मुक्कामी राहूनही दुर्राणींना अजित पवार भेटले नव्हते. त्यामुळे दुर्रानी परभणी येथे परतले होते. त्यानंतर दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सूरू झाल्या होत्या. मात्र नंतर अजित पवारांनी याची दखल घेत दुर्राणी यांच्या भेटासाठी निरोप पाठवला व ते मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ग्रामीण भागातही मनसेची क्रेझ; अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा भगवा

महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल

भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट