Home महत्वाच्या बातम्या शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?

शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेससोबत युती करणार असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. आम्ही उत्तर प्रदेशात चाचपणी करत आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधींना मी भेटणार आहे. उत्तर प्रदेशातील युतीबाबत चर्चा झाली तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीच्या चर्चा मीडियात आहेत. आमच्यात काही अशी चर्चा झाली नाही. आम्ही मीडियातूनच या चर्चा वाचत आहोत. आज मी राहुल गांधींना भेटत आहे. त्याला तुम्ही कर्टसी व्हिजीट का म्हणत नाही? आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाशी संवाद असावा वाटतो. त्यामुळे दिल्लीत असल्यावर एकमेकांना भेटून चर्चा करतो, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : “सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड”

राज्यातील राजकारण, सरकारचं कामकाज आणि देशातील घडामोडीवर यावेळी चर्चा होत असतात. पाच राज्यात निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात लढत आहोत. उत्तर प्रदेशात चाचपणी सुरू आहे. काँग्रेसही यूपीत लढत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी उत्तर प्रदेशात लढण्याबाबत चर्चा झाली तर चर्चा करू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील

माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

…तर ओबीसींना आरक्षण परत मिळू शकते; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पर्याय