Home महाराष्ट्र शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे

शिवसेना UPA मध्ये सहभागी झाली तरीही फरक पडणार नाही- नारायण राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  भाजपची साथ सोडल्यावर आता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत नारायण राणे यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेने बेइमानी करून सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकले. शिवसेना यूपीएत सहभागी झाली तरीही काहीही फरक पडणार नाही. भाजपचे 303 खासदार आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

हे ही वाचा : भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार

शिवसेनेचे महापालिकेत 10 नगरसेवक आहेत, त्यांची देशात सत्ता येणार का? असा सवाल उपस्थित करत फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात, असं म्हणत नरायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारच्या टायटॅनिकमध्ये कोणीही बसणार नाही. भाजपमधून कोणीही तिकडे जाणार नाही. कारण आमची बोट सुरक्षित आहे. इथून निघते थेट दिल्लीला जाते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही बुडणारी टायटॅनिक आहे. या जहाजाला प्रत्येक जण आपापल्या बाजूने खेचत असल्याने या बुडणाऱ्या जहाजात कोणी बसणार नाही,असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आल्याचे राणे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम लोकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. पुन्हा एकदा महापालिकेत भाजपची सत्ता यावी यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वारं; रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं भांडवल करणं हे भाजपच्या नेत्यांना चांगलं जमतंय”

नितेश राणे स्वत: थकबाकीदार, ते बँक काय चालवणार; शिवसेनेचा हल्लाबोल