Home महाराष्ट्र “सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”

“सांगलीत गणेश दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53भक्तांना नोटिस”

सांगली : सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे संकष्टीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलेल्या 53 गणेशभक्तांना पोलिसांनी ताकीद नोटीस देऊन टाळेबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे .

संकष्टी चतुर्थीवेळी दर्शन घेण्याची परंपरा काही गणेश भक्तांनी जोपासली आहे. मात्र टाळेबंदी जाहीर झाल्यापासून सांगलीतील गणेश मंदिर प्रवेशासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तरीही आज संकष्टीचे औचित्य साधून किमान बाहेरून तरी गणेश दर्शन करण्याच्या हेतूने काही गणेशभक्त गणपती मंदिराकडे आले होते.

दरम्यना, अधिक काळ गणेश मंदिराच्या समोर रस्त्यावर बसवण्यात आले. आलेल्या सर्वाना ताकीद नोटीस बजावण्यात आली असून पुन्हा जर अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटिस बजावण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो; मुख्यमंत्र्यांच जनतेला आवाहन

“संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो”

पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी