आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग बँक निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिलाय. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गवस यांचा भाजप प्रवेश हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे.
प्रकाश गवस यांनी यापूर्वी दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल, असे वाटत होतं. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
हे ही वाचा : ‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच सत्तेची घाई, अन्…’; जयंत पाटलांचा खोचक टोला
निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र शेवटच्यादिवशी प्रकाश गवस यांनी भाजपात प्रवेश करत दोडामार्ग विकास संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्जही दाखलही केला आहे.
दरम्यान, नितेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत प्रकाश गवस यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषदेतील गटनेते रणजित देसाई, माजी सभापती प्रमोद कामत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…
देवेंद्र फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हांला काही घेणं देणं नाही; विनायक राऊतांचा टोला
राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…