आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंदीगड : वर्षभर चाललेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनानंतर अखेर तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यात आले होते. यावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणाैतने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हटलं होतं. त्यामुळे कंगणावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अशातच आता पंजाबमधील किरतपूर येथे शेतकऱ्यांनी कंगनाची कार अडवल्याचं पहायला मिळालं.
हे ही वाचा : पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार- देवेंद्र फडणवीस
कंगना तिच्या सुरक्षा कर्मचार्यांसह कारमध्ये होती, त्यादरम्यान आंदोलकांनी तिची कार अडवली. या आंदोलकांच्या हातात झेंडे होते आणि आंदोलक घोषणा देत होते. कंगनाने माफी मागावी, अशी मागणी आंदोलक शेतकरी करताना दिसत होते. त्यानंतर कंगणाने उपस्थित आंदोलकांची माफी मागितल्यानंतर तिला जाता आलं.
Actress #KanganaRanaut car forcefully stopped by mob in Punjab. Actress claims she was surrounded by protesting #Farmers pic.twitter.com/LihQWiYJKU
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) December 3, 2021
दरम्यान, इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत कंगनाने दावा केला की, ‘मला येथे जमावाने घेरले आहे. ते माझ्याविरोधात अपशब्द वापरत आहेत आणि जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
ठाण्यात 2 दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का; नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीची मोठी खेळी; औरंगाबाद शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ मुस्लिम चेहऱ्याला संधी
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा