Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला विविध पातळ्यांवर केंद्राची मदत लागणार आहे. केंद्राने मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती उद्धव यांनी मोदींकडे केली. तसंच मोदींनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

जितेंद्र आव्हांडाना ठोकण्याची भाषा करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

केंद्र सरकावर टीका करण्याचा अधिकार राज्याने गमावून बसलाय- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील; पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामचं कौतुक

…म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपनं किरीट सोमय्यांच तिकीट कापलं- नवाब मलिक