आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला सतेतून पायउतार व्हावे लागेल. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीचं लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. याला आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात; सदाभाऊ खोत यांची टीका
काँग्रेसला वगळून सगळ्या पक्षांना एकत्र आणूण मोट बांधण्याचे ममता-पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता या राजकीय बैठका होत आहेत. तसंच ममता बॅनर्जींच्या कालच्या दौऱ्यामध्ये उद्योग आकर्षित करणे हा मुख्य दिखाऊपणा होता. मूळ अजेंडा तो राजकीय होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, सगळ्यांनाच हे मान्य असेल की, 2024 ला मोदीचं सत्तेत येणार आहेत. त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी म्हणून काय रणनीती करता येईल, सगळ्यांना कसं एकत्र येता येईल, यासाठी ही खलबतं चालली आहेत. असले प्रयोग 2019’ला ही झाले. त्या प्रयोगांना यश आलं नाही. …, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”
ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबरला मराठवाड्या दाैऱ्यावर; आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठक