आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मान आणि मनक्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्रास वाढू लागल्याने त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हे ही वाचा : “कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”
रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना मागील अनेक दिवसांपासून मानदुखी व पाठदुखीचा त्रास जाणवत होता. याच कारणामुळे ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळत होते. किंवा अनेक कार्यक्रमांना ते ऑनलाईन उपस्थिती दर्शवत होते. शेवटी मानदुखीचा त्रास अधिकच वाढल्यानंंतर अखेर त्यांना शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागला.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात”
चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी अहवालाची प्रतिक्षा
भाजप हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल