आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत भाजपविरोधात तिसरा पर्याय देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती ममता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधलाय.
शरद पवांच्या उपस्थित ममता बॅनर्जी म्हणाल्या की यूपीए संपली, याचा काँग्रेसनं विचार करायला हवा का? असा सवाल करत त्यावेळी काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा. याचं कारण काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच उभं राहिलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न मनात पडत असेल तर ते जनतेसमोर काय मांडणार? अशी टीका शेलार यांनी केली आहे.
हे ही वाचा : “आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो”
दरम्यान, ‘जे स्वत: पराभूत आणि नकारात्मक वृत्तीमध्ये आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्याच्या भूमिकेवर चर्चा करु नये. जे दुबळे आहेत, कमजोर आहेत, त्यांनी दुसऱ्याच्या विरोधात लढण्यामध्ये फुशारकी मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. लोकशाहीत निवडणुका येतील तेव्हा नक्की या, एकटे या नका येऊ. मुळामध्ये यूपीए संपली म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काय काँग्रेस विसर्जित केली आहे का? काँग्रेसला हे मान्य आहे का? आणि काँग्रेसविरोधात अशी घेतलेली भूमिका ही शिवसेनेच्या समर्थनावर घेतली आहे का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांना करावा लागणार आहे, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक; महापालिका आयुक्तांना लिहिलं पत्र; म्हणाले…
ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय; भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे”