आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत आठवले यांनी शहा यांच्याकडे महात्मा फुले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
रामदास आठवले यांनी आज अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. यावेळी त्यांनी शहा यांच्याकडे ही मागणी केली. महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्रीशिक्षणाचे प्रणेते आहेत. त्यांनी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांचे मानवी हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले काम युगप्रवर्तक आहे. भारत राष्ट्र म्हणून महापुरुषांच्या विचारांमुळे मजबुतीने प्रगती करीत आहे. महत्मा फुलेंचे कार्य अजोड आणि सदैव प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याचा भारतरत्न ‘किताब देऊन गौरव करण्यात यावा याबाबतचे पत्र आज रामदास आठवले यांनी शहा यांना दिलं आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ; केली ‘ही’ मागणी
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर गाजलेले आहे. त्यांचे साहित्य अखिल मानवजातीला प्रेरणादायी आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा भारतरत्न या किताबाने गौरव झाला पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी या पत्रातून केली आहे.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप-रिपाइं युती करण्यावरही चर्चा करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांइतकीच राजकीय उंची असलेल्या ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या; संजय राऊतांकडून काैतुक
“शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा