Home महाराष्ट्र सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?

सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षदाच्या निवडीबाबत अधिसूचनाजारी केली गेली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 6 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर कॉंग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार असून जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आणि महेंद्र लाड यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

हे ही वाचा : भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. तशातच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून बँकेत अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्‍चितच आहे. अध्यक्षपदासाठी आमदार नाईक हे पूर्वीपासूनच इच्छुक आहेत. परंतू त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यांच्यासह विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, चिमण डांगे, सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या सर्वात आमदार नाईक हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे. जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड हे दावेदार मानले जात आहेत. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महाआघाडीतील हालचाली वाढल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालाय; मेहबूब शेख यांचा निलेश राणेंवर हल्लाबोल

आगामी महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी दिलं जोरदार उत्तर; म्हणाल्या…