आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.
तुम्ही मागील संसद अधिवेशनाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास कशा प्रकारे पुरुष मार्शल महिला खासदारांना धक्काबुक्की करीत होते, हे तुम्हाला दिसेल. हे सगळ्या एका बाजूला आणि तुमचा आजचा निर्णय दुसऱ्या बाजूला? सरकारचे हे कोणत्या प्रकारचे असंसदीय वर्तन सुरू आहे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : भाजपाचा शिवसेनेला दणका; भाजपात प्रवेश करणाऱ्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती
जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरोपींना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांना वकील दिले जातात तर कधी सरकारी अधिकारी त्यांची बाजू ऐकायला जातात. संसदेत आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिलीच नाही, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यमान, निलंबित करण्यात अलेल्या या बारा जणांमध्ये शिवेसेनेचे दोन, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांकडे तक्रार
महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…