आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेविरूद्ध मनसेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा : महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने निवडणुकीच्या आधी ठाणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, यासाठी शिवसेनेविरुद्ध अनेक आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण नाही केलं, यासाठी शिवसेनेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार आज ठाणे पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिली.
निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी आश्वासने देतात परंतु निवडणूक संपल्यानंतर त्याकडे कानाडोळा करतात. ठाणे महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील ठाणेकरांना तीस एकरमध्ये सेंट्रल पार्क, मुबलक पाणीपुरवठ्यासाठी स्वतःचे धरण, ठाणे-नवी मुंबईला जोडणारी जलवाहतूक अशी आश्वासने दिली होती, परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. ही ठाणेकरांची फसवणूक आहे. यापुढे, कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारची फसवणूक करू नये यासाठी शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अविनाश जाधव यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार हे चुकीचंच”
राज्यसभेत गोंधळ; शिवसेनेचे 2 तर काँग्रेसचे 6 खासदारन निलंबित