Home महाराष्ट्र मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. मनसे कामगार सेनेचे रायगड जिल्हा चिटणीस लक्ष्मण वानखेडे आणि सहचिटणीस जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करंजाडे शहरातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश केला.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन करंजाडे शहरातील महिलांनी मनसेचा भगवा हाती  घेतला आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपचं सरकार येणं आवश्यक- प्रवीण दरेकर

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष स्नेहल जाधव, मनसे महिला सेनेच्या रायगड जिल्ह्याध्यक्ष आदितीताई सोनार, मनसे व्यापारी सेनेचे राज्य उपाध्यक्ष नितीन काळे, महिला सेना तालुका अध्यक्ष वर्षा पाचबाई, पनवेल महानगरपालिका पालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब, कामोठे मनसे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, वाहतूक सेनेचे पनवेल तालुका चिटणीस सुजित सोनवणे, कामोठे मनसे उपशहराध्यक्ष मनोज कोठारी, विद्यार्थी सेनेचे पनवेल शहराध्यक्ष अनिकेत मोहिते, काळुंद्रे मनसे शाखाध्यक्ष सचिन कोनकर, महाराष्ट्र सैनिक सागर गायकवाड, प्रफुल्ल घरत, यश मायनार, स्वप्नील शिंदे, गोपाळ बरोडे, सुहास भनगे, निलेश पाटील यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात”

मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही- एकनाथ खडसे

“भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”