आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना ठाकरे सरकार आता लवकरचं पडेल असं म्हटलं होतं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सामना अग्रलेखातून विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
हे ही वाचा : मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही- एकनाथ खडसे
गेल्या दोन वर्षात सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.
भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला संजय राऊतांनी यावेळी भाजपला दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”
…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर
राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे