आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शिंदे यांना अवघ्या एक मताने पराभव पत्करावा लागला होता. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; रत्नागिरीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश”
मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं शरद पवार म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, शिंदे यांच्या पराभवानंतर त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर शिंदे यांनी समर्थकांच्या कृत्यावरुन दिलगिरीही व्यक्त केली होती. तसेच शरद पवारांनी या घटनेनंतर काल संध्याकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शशिकांत शिंदेही उपस्थित होते. याच बैठकीत पवार शिंदेंच्या पराभवाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?”
…तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; किरीट सोमय्यांचं थेट ठाकरे सरकारला आवाहन
“आगामी निवडणुकीच्याआधी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दोन नेत्यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”