Home महाराष्ट्र केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको-...

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको- मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज करु नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं म्हणत राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

घरी असताना लोक वेगवेगळया समस्यांचा सामना करतायत, लोक कंटाळले आहेत हे मी समजू शकतो. पण COVID-19 ला पराभूत करण्यासाठी घरी थांबण्यावाचून पर्याय नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बंगल्यावर नेऊन अभियंत्याला बेदम मारहाण; जितेंद्र आव्हाडांवर आरोप