Home महाराष्ट्र मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

मनसेचा एमआयएमला धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. अशातच मिरज येथील एमआयएमसह अवामी विकास पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मनसेत पक्षप्रवेश केला आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीची ताकद वाढणार; पक्ष मजबूतीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘या’ चेहऱ्यांना संधी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील अवामी विकास पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जमीर सनदी, एमआयएमचे मिरज शहर अध्यक्ष सईद सौदागर, सोहेल काजी आणि ढवळी ग्रामपंचायत सदस्य अकबर मुलानी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, या प्रसंगी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, उपजिल्हाध्यक्ष विलास कांबळे, तालुकाध्यक्ष विकास मगदुम, शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबई महापालिकेने बाबासाहेब पुरंदरेंच्या कलादालनाची निर्मिती करावी; भाजपची मगाणी

महाविकास आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची टीका

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास