महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

0
198

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असंही आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी जिल्हाप्रमुखांना दिलं.

दरम्यान, कोरोनाच्या काळात सरकार आपलं काम करत आहे, पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी जिल्हाप्रमुखांना केल्या.

महत्वाच्या घडामोडी-

तुला थोबडवनार आता आम्ही मराठी; मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जानकुमार सानूला मनसेचा दणका

…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

…तर खंबीर मराठा समाज सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

राशिद खानची शानदार बाॅलिंग; सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here